Sunday, June 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सरकारच्या ‘या’ योजनेत 2 महिन्यांत 5 लाख महिलांनी पैसे गुंतवले, मिळतोय जबरदस्त फायदा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 7, 2023
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना, 1 एप्रिल 2023 पासून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली विशेष बचत योजनेला महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे. सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत 5 लाख महिलांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. मे अखेरपर्यंत या योजनेत एकूण 3,636 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. याचा अर्थ महिला गुंतवणूकदारांनी यामध्ये सरासरी 73,000 रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा दोन लाख रुपये आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे (MSSC) खाते सध्या पोस्ट ऑफिसमध्येच उघडले जात आहे. आगामी काळात बँकांमध्येही खाती उघडली जातील.

दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली होती. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणुकीसाठी ७.५ टक्के वार्षिक व्याज (MSSC व्याज दर) प्राप्त होत आहे. गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही, परंतु गुंतवणूकदाराला मिळालेल्या व्याजावर कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल. या योजनेत मार्च २०२३ पर्यंतच गुंतवणूक करता येईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत फक्त महिलाच खाते उघडू शकतात. अल्पवयीन मुलींच्या नावाने पालक खाते उघडू शकतात.

अधिक गुंतवणूक वाढेल
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत दोन वर्षांच्या मुदतीसह आणखी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. सध्या बँकांमध्ये या योजनेची खाती उघडली जात नाहीत. बँकांनी ही योजना राबविण्याची तयारी केली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची खाती जेव्हा बँकांमध्ये सुरू होतील, तेव्हा या योजनेत पैसे गुंतवणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकही वाढली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट करून 30 लाख रुपये केली. सरकारच्या या निर्णयानंतर या योजनेत खर्च होणारा पैसाही वाढला आहे.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 23,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा 6,000 कोटी रुपये होता. गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. जून तिमाहीत ज्यांनी या योजनेत पैसे ठेवले त्यांना 8.2 टक्के वार्षिक व्याज मिळाले. त्याच वेळी, गेल्या तिमाहीत व्याज दर 8 टक्के होता.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृहातील विविध पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

RBI ने सलग दुसऱ्यांदा दिली खुशखबर! रेपो दर जुन्या पातळीवरच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?

RBI ने सलग दुसऱ्यांदा दिली खुशखबर! रेपो दर जुन्या पातळीवरच

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

June 27, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page