पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात ८ जणांचा मृत्यू झाला, तर हडपसर परिसरात आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विषारी दारू प्रकरणामुळे अनेक हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
हडपसरमध्ये ५ जणांचा मृत्यू
हडपसर आणि काळेपडळ परिसरात पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्यानंतर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल शरद क्षीरसागर (वय ४५, पांढरे मळा, हडपसर)
विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५, ससाणे नगर, हडपसर)
अरुण डाडर (हडपसर)
अशोक रमेश चव्हाण (काळेपडळ)
विजय भूकुरलाल शर्मा (पांढरे मळा, ससाणे नगर)
पिंपरी-चिंचवडमध्ये ८ जणांचा मृत्यू
फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरातही विषारी दारू पिल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची नावे पुढीलप्रमाणे :
पांडुरंग फुगे
विजय प्रकाश राठोड
राजेंद्र प्रकाश राठोड
राजू रजपूत
अकबर पठाण
बाबा शेख
आनंद देसाई
आनंद निकाळजे
दोघांची प्रकृती चिंताजनक
सुभाष डिगीकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल
अक्षय अवसरमल – यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल
या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी सर्व मृत्यूंचे कारण एकसारखे असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर आणि फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पुढील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.















Discussion about this post