Thursday, October 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग
बातमी शेअर करा..!

जळगाव । सणासुदीच्या दिवसांत जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याच्या निषेधार्थ बुधवारी अचानक संप पुकारला. घंटागाड्यांवरील चालक आणि हेल्पर अशा सुमारे २८५ कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने शहरातील कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले. एकही घंटागाडी रस्त्यावर न उतरल्याने शहरात सुमारे २५० टन कचरा साचल्याची माहिती समोर आली आहे.

बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार थकीत असल्याने त्यांच्यात नाराजी वाढली होती. सणासुदीच्या काळातही वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. बुधवारी सकाळी सहा वाजता हे कर्मचारी शिवाजी उद्यान परिसरातील टीबी सेंटरच्या जागेवर एकत्र आले. जोपर्यंत खात्यात वेतन जमा होत नाही, तोपर्यंत कचरा संकलनाचे काम सुरू करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचे नियोजन विस्कळीत झाले. शहरातील घराघरांतून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद राहिल्याने नागरिकांसमोर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण झाला.

महापालिकेकडे २० कोटींचे बिल थकीत असल्याचा दावा

बीव्हीजी कंपनीचे महापालिकेकडे मार्च महिन्यापासून सुमारे २० कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील नऊ महिन्यांपासून महापालिकेकडून बिलाची रक्कम मिळालेली नसल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीने यापूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे दिले होते. मात्र, यावेळी एका महिन्याचा पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. कंपनी आणि महापालिका यांच्यातील आर्थिक प्रश्नाचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला असून, त्यातूनच संपाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग; नागरिक त्रस्त

घंटागाड्या न आल्याने अनेक नागरिकांना घरातील कचरा बाहेरच ठेवावा लागला. काही ठिकाणी नागरिकांनी नाइलाजाने गल्लीबोळांत कचरा टाकल्याने विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सणासुदीच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत राहणे अपेक्षित असताना, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेचे थकीत बिल, कंपनीची आर्थिक अडचण आणि कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन या सगळ्याचा फटका मात्र जळगावकरांना बसत आहे.

संपावर तोडगा कधी निघणार?

कर्मचाऱ्यांनी वेतन खात्यात जमा होईपर्यंत कामावर परतणार नसल्याची भूमिका घेतल्याने कचरा संकलन पूर्ववत होण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन आणि बीव्हीजी कंपनी यांच्यातील थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लागून कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाल्यासच परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि शहरातील कचरा संकलन कधी सुरू होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत राडा! अभिजीत दिपकेंचा संताप

Next Post

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन व पेपरलेस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन व पेपरलेस

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन व पेपरलेस

October 15, 2026
पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग

पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग

October 15, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत राडा! अभिजीत दिपकेंचा संताप

कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत राडा! अभिजीत दिपकेंचा संताप

October 15, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय लष्करात अधिकारी होण्याची संधी! १२वी पाससाठी भरती; ५६,१०० विद्यावेतन मिळेल

October 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page