Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड
बातमी शेअर करा..!

सुप्रसिद्ध हिंदी व्यंगकवी संपत सरल यांच्या हस्ते उद्घाटन

धुळे – खानदेशातील अमळनेर येथे दि. 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी अठराव्या विद्रेाही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर हे कर्मभूमी राहिलेल्या साने गुरुजींच्या 125 व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमलेनाचे आशयसूत्र ’प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता‘ या मूल्य समर्थनार्थ आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद्घाटक आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभलेले  व्यंगकवी संपत सरल यांच्या हस्ते होणार आहे.तर दोनदा साहित्य अकादमी विजेते प्रख्यात उर्दू साहित्यिक रहेमान अब्बास ह्यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले,  विद्रोही संमेलनाचे मुख्य संयोजक लीलाधर पाटील, प्रवर्तक अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
. यावेळी 18 व्या विद्रोही साहित्य संमलेनाच्याआयोजन संदर्भात माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून विद्रोही मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत  मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे इ. ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार, प्रा. डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते,चंद्रकांत वानखेडे आदी सर्जनशील, प्रगतीशील, साहित्यिक, नाटककार, कवी, समीक्षक आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवित  विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज आपल्या अध्यक्षीय मांडणीतून बुलंद केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.
18 व्या विद्रोही साहित्य संमलेन, अमळनेर येथील प्रस्तावित अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांनी विपुल प्रमाणात, दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे. ’विषवृक्षाच्या मुळ्या‘ ही कादंबरी, ’व्यथाफूल‘, ’अबॉर्शन आणि इतर कथा’, ’अंधाररंग’, ’झाड आणि समंध’ इ. कथासंग्रह ’झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथन इत्यादी ललित साहित्य प्रसिद्ध असून  ’सहा दलित आत्मकथने’, ’ग्रामीण कथा स्वरूप व विकास’, ’ग्रामीण  साहित्य : स्वरूप व दिशा’, ’नवे साहित्य नवे आकलन’, साहित्य : ’रूप आणि स्वरूप’, ’ग्रामीण साहित्य चिंतन आणि चर्चा’, ’साहित्य, समाज आणि परिवर्तन’ इत्यादी समीक्षात्मक ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे.  कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र, आत्मकथन इत्यादी विविध साहित्य प्रकारांमधून त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे आजवर सहा कथासंग्रह, एक कादंबरी, चौदा समीक्षात्मक ग्रंथ, एक दीर्घ कथा संग्रह, एक एकांकिका आणि आत्मकथनासह पंधरा संपादित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
संपत सरल, आज हे नाव जगभर विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध आहे.  राजस्थानमधील शेखावती या गावचे मूळ रहिवासी आहेत . हास्य व व्यंगाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारा विद्रोही कवी म्हणून त्यांनी जगभर आपला ठसा उमटवला आहे. संपत सरल यांनी संपूर्ण भारतासह यूएसए, कॅनडा,सौदी अरेबिया आणि नेपाळ आदी विविध देशात आपले काव्य आणि मुशायरा सादर केले आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जाते. ’चाकी देख चुनाव की’ आणि ’छद्मविभूषण’ हे त्यांचे काव्य संग्रह तर ’हम है ना’, ’करम धरम’, ’चक्कर पे चक्कर’, ’बेटा बेटी के लिए’, ही टीव्ही वरील नाटके प्रसिद्ध आहेत. तर रहेमान अब्बास हे   प्रख्यात उर्दू कादंबरीकार विद्रोही संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.रहेमान अब्बास हे मूळ चिपळूण चे रहिवासी असुन त्याना रोहजिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पारितोषक २०१८ मध्ये मिळाले आहे तर २०११ व२०१७ ची राज्य पारितोषिकचे ते मानकरी आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात ; तीन सभामंडपांची उभारणी

Next Post

विवाहीत तरूणीने गळफास घेऊन संपविले जीवन : यावल तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

विवाहीत तरूणीने गळफास घेऊन संपविले जीवन : यावल तालुक्यातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

July 7, 2026
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

July 7, 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

July 7, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page