पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र आता वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी सोडून आता वसंत मोरे हे ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून यापूर्वी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता. यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता. ‘साहेब मला माफ करा’, असे मी त्या मेसेजमध्ये लिहले होते.
मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता. पण आता खूप उशीर झाला आहे मी त्यांना ठीक आहे बोललो, पण काल उद्धव ठाकरे यांना भेटलोच, असे वसंत मोरे यांनी म्हटले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमध्यमांशी बोलत होते.















Discussion about this post