Friday, November 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘वंदे मातरम् शिबिरा’चे आयोजन; सहा राज्यांतील १५० युवक-युवतींचा सहभाग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले
बातमी शेअर करा..!

जळगाव : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जळगाव यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सात दिवसीय ‘वंदे मातरम् शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शिबिराचा समारोप ४ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

दिनांक २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात देशातील गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि बिहार या सहा राज्यांमधील प्रत्येकी २५ याप्रमाणे एकूण १५० युवक-युवती सहभागी होणार आहेत.

या शिबिराचा मुख्य उद्देश विविध राज्यांतील युवकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, संवैधानिक मूल्यांची जाणीव, नेतृत्वक्षमता आणि सांस्कृतिक समन्वय विकसित करणे हा आहे.

शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधीत सहभागी युवकांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, नागरी शास्त्र (Civic Sense), मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, विधी सेवा (Legal Services) आणि व्यक्तिमत्त्व विकास (Personality Development) यांसारख्या विषयांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्ती या सत्रांच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाणघेवाण. विविध राज्यांतून आलेले युवक आपापल्या राज्यांची संस्कृती, परंपरा, लोककला, नृत्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सादर करणार आहेत. यामुळे सहभागी युवकांना विविध राज्यांच्या सांस्कृतिक वारशाची ओळख होण्यासोबतच परस्परांमध्ये मैत्री आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

युवकांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धांचाही समावेश असून, सहभागी युवकांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय युवकांसाठी शैक्षणिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गांधी तीर्थ, अजिंठा लेणी तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश आहे. या भेटींच्या माध्यमातून युवकांना महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जवळून जाणून घेता येणार आहे.

विविध राज्यांतील युवकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक आदानप्रदान, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 247 पदांसाठी भरती ; पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘वंदे मातरम् शिबिरा’चे आयोजन; सहा राज्यांतील १५० युवक-युवतींचा सहभाग

November 27, 2026
NMDC मध्ये तब्बल ९३४ पदांसाठी भरती; १,७०,००० रुपये पगार मिळणार, त्वरित अर्ज करा

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 247 पदांसाठी भरती ; पात्रता काय?

November 27, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

महिला आरक्षणासाठी मोठा डाव; डीलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

November 27, 2026
जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका; तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करत लाखोंचा दंड वसूल

November 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page