चाळीसगाव । एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून अशातच भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला तर प्रकार हा फक्त नमुना असून यामागचं खरं मोठं विद्यापीठ बीएचआर आणि इतर माध्यमातून भूखंड लूट करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही उन्मेष पाटील यांनी जोरदार टीका केली. “मंगेश चव्हाण हा पाठीत खंजीर खुपसणारा नेता आहे. मी आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे त्याचे पहिली दोन उदाहरणे आहेत. आता पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रकरणात त्यांचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे,” असे त्यांनी म्हटले.
चाळीसगावातील एमआयडीसी परिसरात शेकडो कोटींच्या गौण खनिज चोरीचा आरोपही त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या गटावर केला. “मी कामांमधून टक्केवारी घेत नाही, पण मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावची लूट चालू आहे. या सर्वांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही लूट यात्रा काढणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post