Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा
बातमी शेअर करा..!

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न
जळगाव |  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या व सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपवनसंरक्षक जमीर शेख, राम धोत्रे तसेच भुसावळ , रावेर, नशिरबाद, फैसपुर, वरणगावचे नगराध्यक्ष उपस्थित होते.

केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी रेल्वे विभागाच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजने अंतर्गत प्रस्तावित कामांसदर्भात सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता समन्वयाने कामे पुर्ण करावीत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठरवून दिलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत मध्य रेल्वे विभागातर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. अमृत भारत, वन स्टेशन-वन प्रोडक्ट, आदी महत्वाच्या प्रकल्पाच्या कामांचा यावेळी आढावा त्यांनी घेतला. सुरक्षिततेचे निकष पाळणे गरजेचे असून स्थानिक परिस्थितीचा विचार करून कामे पूर्ण करावीत, काही ठिकाणी रेल्वे पुलांच्या जॉईंट एलिमेंट्सच्या दुरुस्तीबाबतही सूचना त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्यात.बैठकीत रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, जलजीवन मिशन, ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी, आरोग्य व शिक्षण विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी घेतला.

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतील सहभाग लक्षात घेता विविध योजनांच्या कामासंदर्भात जिल्ह्यातील खासदारांसमवेत चर्चा करण्यात यावी. तसेच कामांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार व आमदार दोघांनाही प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कामांचे प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल तयार करावा, जेणेकरून समन्वयातून कामे वेळेत पुर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विविध विकासकामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत विकासकामांच्या गतीसाठी समन्वय, पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीला सर्व संबधित विभागांचे प्रमुख, तहसिलदार, नगर पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

Next Post

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page