Thursday, October 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमार्गे उधना–अमरावती विशेष रेल्वेला मंजुरी ; जाणून घ्या वेळापत्रक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार
बातमी शेअर करा..!

जळगाव। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असून, ही गाडी २६ ऑक्टोबरपासून साप्ताहिक स्वरूपात सुरू होणार आहे. नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवावी, अशी मागणीही धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने केली आहे.

अनेक दिवसांच्या मागणीला यश
उधना आणि अमरावतीदरम्यान थेट रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होत होती. उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना विदर्भात जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय मिळावा, तसेच उधना परिसराशी रेल्वे संपर्क वाढावा, या उद्देशाने धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला. खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनाही या मागणीसाठी गती मिळाली. अखेर रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०१३/०९०१४ उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

उधनाहून सोमवारी सकाळी सुटणार गाडी
उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल उधना स्थानकावरून दर सोमवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे.
स्थानक आणि आगमनाची वेळ
नंदुरबार दुपारी १:३५
अमळनेर दुपारी ३:२०
धरणगाव दुपारी ३:५०
जळगाव दुपारी ४:४०
भुसावळ सायंकाळी ५:१५

या सेवेमुळे मार्गावरील प्रवाशांना उधना आणि पुढील ठिकाणांपर्यंत जाण्यासाठी आणखी एक रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.

अमरावतीहून परतीची गाडी रात्री ११:३० वाजता
परतीच्या प्रवासात अमरावती–उधना सुपरफास्ट स्पेशल दर सोमवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी अमरावतीहून सुटणार आहे. मंगळवारी पहाटे ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील स्थानकांवर पोहोचेल.
स्थानक आणि आगमनाची वेळ
भुसावळ पहाटे ३:२०
जळगाव पहाटे ४:००
धरणगाव पहाटे ४:५०
अमळनेर सकाळी ५:०९
नंदुरबार सकाळी ६:४०

या वेळापत्रकामुळे विदर्भातून जळगाव, भुसावळ आणि पुढे उधना परिसरात जाणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचा लाभ घेता येणार आहे. या रेल्वे सेवेसाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे (DRUCC) सदस्य महेंद्र शिवराज कोठारी यांनी सातत्याने प्रयत्न केले. ताप्ती सेक्शनसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांच्या अडचणी रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.

या मागणीसाठी निवेदने देणे, वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे आणि सातत्याने पाठपुरावा करणे अशा माध्यमांतून प्रयत्न करण्यात आले. अखेर विशेष रेल्वेला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

BHEL मध्ये ६६० पदांसाठी भरती! दहावी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

जळगावमार्गे उधना–अमरावती विशेष रेल्वेला मंजुरी ; जाणून घ्या वेळापत्रक

October 22, 2026
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नोकरी करण्याची संधी; ५१५ पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

BHEL मध्ये ६६० पदांसाठी भरती! दहावी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी

October 22, 2026
जामनेर तालुक्यात मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जामनेर तालुक्यात मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

October 22, 2026
एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ

मनोज जरांगेंचा ५०० कोटींच्या आरोपांबाबत मोठा दावा; पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवली, राज्यात खळबळ!

October 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page