Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | केंद्र सरकारमार्फत जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) वर्ष २०२७ करिता पात्र मान्यवरांच्या नावांचे नामांकन/शिफारसी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 31 जुलै, 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसाठी नामांकन व शिफारशी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कारांकरिता नामांकन/शिफारस सादर करताना केंद्र शासनाचे पुढील महत्त्वाचे निकष विचारात घ्यावेत :
संबंधित व्यक्तीचे कार्य “Excellence Plus” या निकषांनुसार अत्युच्च दर्जाचे असावे. त्या उल्लेखनीय कार्यात समाजसेवा हाही एक घटक असणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कार हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असल्याने मान्यवरांची शिफारस करताना संबंधित व्यक्तीस यापूर्वी राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत का, याचीही नोंद घ्यावी. पुरस्कारासाठी नावे सुचविताना समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला, दिव्यांग व कमकुवत घटकांमधील प्रतिभासंपन्न व्यक्तींचाही विचार व्हावा.

मरणोत्तर पुरस्काराची शक्यतो शिफारस करु नये. तथापि, उच्चतम गुणवत्तेच्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये जानेवारी २०२६ नंतर निधन झालेल्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो. त्यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तींच्या शिफारसी सादर करू नयेत.

पद्म भूषण पुरस्कारासाठी मान्यवरांची शिफारस पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्यानंतर ५ वर्षांनी करता येईल, तसेच पद्म विभूषण पुरस्कारांसाठी मान्यवरांची शिफारस पद्म भूषण प्राप्त केल्यानंतर ५ वर्षांनी करता येईल. तथापि ही मर्यादा अपवादात्मक प्रकरणांमध्ये शिथील करण्याचा विचार करता येईल.शासकीय सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रमातील डॉक्टर व वैज्ञानिक वगळता अन्य कर्मचारी अधिकारी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत.

उपरोक्त निकषांच्या आधारे शिफारस योग्य असतील असे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शिफारस सादर करावी, दिनांक ३१ जुलै, २०२६ नंतर पोर्टलवर नामांकन/शिफारस स्विकारण्यात येणार नाहीत. असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रूपयांची वैद्यकीय मदत

Next Post

मोठी बातमी । शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईकवर बडतर्फीची कारवाई, पीआयची बदली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मोठी बातमी । शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईकवर बडतर्फीची कारवाई, पीआयची बदली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page