चाळीसगाव : चाळीसगावात पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान एक धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. तो म्हणजे एका महिलेच्या घरातून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १८ तलवारी आणि १० कोयत्यांसदृश धारदार शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला.याप्रकरणी शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चाळीसगावातील इंदिरानगर येथील आरती किरण देढे (सध्या रा. नवनाथ नगर, धुळे रोड) तसेच नारायणवाडी येथील महेंद्र रंगनाथ हतांगळे यांच्या भाड्याच्या घरांवर छापेमारी केली. या कारवाईत विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या १८ तलवारी आणि १० कोयत्यांसदृश धारदार शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. याच मोहिमेदरम्यान नागद रोड झोपडपट्टी परिसरात फरीद खान शाबीर खान हा अवैधरित्या तलवार बाळगताना आढळून आला. त्याच्याविरोधातही शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.















Discussion about this post