Tuesday, September 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आजपासून एसटीचा नवा नियम! ‘या’ महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी द्यावे लागणार पूर्ण भाडे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2026
in महाराष्ट्र
0
आजपासून एसटीचा नवा नियम! ‘या’ महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी द्यावे लागणार पूर्ण भाडे
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा नियम लागू झाला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून एसटीच्या अर्ध्या तिकिटाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे कार्ड नसल्यास पात्र प्रवाशांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट आकारले जाण्याची शक्यता आहे.

महामंडळाने सवलतीच्या तिकीट व्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्यासाठी NCMC प्रणाली लागू केली आहे. या प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत सुमारे १.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी झाल्याची माहिती आहे. कार्डची नोंदणी आणि वितरणाची जबाबदारी E-Bix Technologies Ltd. या कंपनीकडे देण्यात आली आहे.

महिलांसह ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना नियम लागू

नव्या व्यवस्थेनुसार एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाची सवलत घेण्यासाठी NCMC कार्डचा वापर करावा लागणार आहे. प्रवासाच्या वेळी कार्ड उपलब्ध नसल्यास सवलतीचे तिकीट नाकारले जाऊ शकते आणि प्रवाशाकडून तिकिटाची पूर्ण रक्कम घेतली जाऊ शकते. त्यामुळे एसटीने प्रवास करण्यापूर्वी संबंधित प्रवाशांनी आपले NCMC कार्ड सोबत असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्डमध्ये रक्कम असणेही आवश्यक

NCMC कार्डचा वापर करून तिकीट काढताना कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवासापूर्वी कार्डमध्ये पुरेशी रक्कम आहे की नाही, तसेच कार्ड टॉप-अप केले आहे की नाही, याची खात्री करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.या नियमाच्या अंमलबजावणीसाठी महामंडळाने राज्यातील सर्व एसटी आगारांना Standard Operating Procedure (SOP) पाठवली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत कार्ड नोंदणीची प्रक्रिया राबवली जात असून, भविष्यात सवलतीस पात्र असलेल्या इतर प्रवर्गांचाही NCMC प्रणालीमध्ये समावेश केला जाणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तूर्तास दिलासा

दरम्यान, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. या वयोगटातील नागरिकांच्या नोंदणीदरम्यान बायोमेट्रिक प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः अनेक ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे व्यवस्थित नोंदवले जात नसल्याने त्यांना कार्ड मिळवताना अडचणी येत आहेत.त्यामुळे ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना सध्या या सक्तीपासून दिलासा देण्यात आला आहे. मात्र, पुढील काळात या प्रवर्गासाठीही डिजिटल सवलत व्यवस्था लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

NCMC कार्डसाठी नोंदणी नसेल तर काय कराल?

ज्या महिला आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप NCMC कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.सवलतीच्या तिकीट व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, पात्र प्रवाशांची डिजिटल पद्धतीने पडताळणी करणे आणि तिकीट व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, हा NCMC प्रणाली लागू करण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका! व्यावसायिक गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी महागला

Next Post

बळीराजाच्या चिंतेत मोठी भर ! IMDचा सप्टेंबर महिन्यातील पावसाबद्दल धक्कादायक अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

बळीराजाच्या चिंतेत मोठी भर ! IMDचा सप्टेंबर महिन्यातील पावसाबद्दल धक्कादायक अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

बळीराजाच्या चिंतेत मोठी भर ! IMDचा सप्टेंबर महिन्यातील पावसाबद्दल धक्कादायक अंदाज

September 1, 2026
आजपासून एसटीचा नवा नियम! ‘या’ महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी द्यावे लागणार पूर्ण भाडे

आजपासून एसटीचा नवा नियम! ‘या’ महिलांना अर्ध्या तिकिटाऐवजी द्यावे लागणार पूर्ण भाडे

September 1, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका! व्यावसायिक गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी महागला

September 1, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाळधी ते तरसोद बायपासवर सुरक्षा नियमांचा बोजवारा ; ठेकेदारसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

September 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page