जळगाव | धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष या गाडीला चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळला थांबा असल्याने नागपूर येथे जाणाऱ्या भाविकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूरदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये अनारक्षित विशेष गाड्यांचाही समावेश असून, प्रवाशांना प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक
रेल्वेच्या प्रसिद्धीनुसार, गाडी क्रमांक ०१०१९ (दोन सेवा) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक ०१०२० (दोन सेवा) नागपूर येथून रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणार आहे.
या दोन्ही गाड्या १९ आणि २२ ऑक्टोबर २०२६ या तारखांना चालविण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे.
अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे
या विशेष रेल्वेगाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा यांसह प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक आणि तिकीटविषयक माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post