Friday, July 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उत्साहात संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उत्साहात संपन्न
बातमी शेअर करा..!

स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक परिसरासाठी विशेष उपक्रम

जळगाव |  जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) विजयकुमार ढगे, तहसीलदार श्री सूर्यवंशी, उमा ढेकळे तसेच ‘वी-ड्रीम सेवाभावी संस्था’ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध शाखाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन सवय बनली पाहिजे, असे सांगितले. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित व प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यालय परिसरातील स्वच्छता करून प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. तसेच परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमामुळे शासकीय कार्यालय परिसर अधिक स्वच्छ, आकर्षक व पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा समन्वय साधणारा हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी स्वच्छता राखण्याची व वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञाही यावेळी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Next Post

आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी, ट्विटची चर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी, ट्विटची चर्चा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी, ट्विटची चर्चा

July 24, 2026
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उत्साहात संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उत्साहात संपन्न

July 24, 2026
मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

July 24, 2026
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी जागांसाठी भरती सुरू; अर्ज कुठे अन् कसा कराल?

July 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page