Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सोनम वांगचुक यांना दिलासा! खासगी रुग्णालयात हलवण्यास हायकोर्टाकडून परवानगी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 21, 2026
in राष्ट्रीय
0
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र होत असताना उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपचाराबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम येथील मेडांता रुग्णालयात हलवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

वांगचुक यांना उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वांगचुक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मागितली होती. उपोषण सुरू असताना त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले की, वांगचुक यांना मेडांता रुग्णालयात हलवण्यास सरकारची कोणतीही हरकत नाही. मात्र, रुग्णालय बदलण्याचा निर्णय हा केवळ डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच घेतला जावा, रुग्णाच्या इच्छेनुसार नव्हे, अशी भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आली.

केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, वांगचुक यांचा डिस्चार्ज आणि पुढील उपचाराबाबतचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यावर आधारित असावा. त्यांच्या आजूबाजूचे काही लोक त्यांच्या आरोग्यापेक्षा आंदोलनाला अधिक प्राधान्य देत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांना मेडांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील आंदोलन अद्याप सुरू असून, आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. दुसरीकडे, सफदरजंग रुग्णालयाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार आणि देखरेख करत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय ; जाणून घ्या कोण-कोणते आहेत?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय ; जाणून घ्या कोण-कोणते आहेत?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 25, 2026
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

September 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव बसस्थानकातील चोरीचा छडा! निलंबित होमगार्ड जेरबंद

September 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

१२वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; १,६८८ पदांची भरती

September 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page