Monday, October 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात शिंदेसेनेला मोठा धक्का! निलेश पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 26, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगावात शिंदेसेनेला मोठा धक्का! निलेश पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत
बातमी शेअर करा..!

जळगाव  । जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षातील नाराजीतून घेतला निर्णय

शिवसेनेत कार्यरत असताना आपल्याला विश्वासात घेतले जात नव्हते आणि संघटनात्मक कामात वारंवार डावलले जात होते, अशी नाराजी निलेश पाटील यांनी व्यक्त केली होती. पक्षातील महत्त्वाच्या बैठकांना बोलावले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, पक्षात काम करताना योग्य संधी आणि जबाबदारी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. संघटनेतील अंतर्गत मतभेद आणि अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याच्या भावनेतून त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अजित पवार गटात प्रवेश केला.

गुलाबराव पाटलांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप

शिवसेनेत असताना आपल्याला योग्य वागणूक मिळाली नाही, तसेच संघटनात्मक प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नव्हते, असे आरोप निलेश पाटील यांनी केले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, या घडामोडीचा शिंदे गटाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

अजित पवार गटाला संघटनात्मक बळ मिळण्याची अपेक्षा

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, प्रतिभा शिंदे, संजय पवार आणि योगेश देसले आदींच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. निलेश पाटील यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल झाले.

या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात निलेश पाटील आणि त्यांचे समर्थक जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कोणती भूमिका घेतात, तसेच या पक्षांतराचा स्थानिक राजकारणावर किती प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्हा बँकेत दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Next Post

मोठी बातमी! राहुल गांधींच्या ताफ्याचा भीषण अपघात! ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

मोठी बातमी! राहुल गांधींच्या ताफ्याचा भीषण अपघात! ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जनतेला विसरून सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त; जळगावात अंबादास दानवेंचा मंत्री महाजनांवर घणाघात

जनतेला विसरून सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त; जळगावात अंबादास दानवेंचा मंत्री महाजनांवर घणाघात

October 26, 2026
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

पदवीधरांसाठी खुशखबर! युको बँकेत 530 पदांसाठी भरती; 29 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 26, 2026
जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

October 26, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

October 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page