नंदुरबार: नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील लोहारा गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून यात गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी होरपळून जखमी झाल्या आहेत. तर गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोहारा या गावातील रामभाऊ ओंकार माळी या शेतकऱ्याने गुरांसाठी व साहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या गोठ्याला सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी जात आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले नाही. दरम्यान सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासात आग आटोक्यात आण्यात आली.
आगीची माहिती अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. मात्र अग्निशामक दलाची गाडीसाठी संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तास उशिराने आली. यामुळे अग्निशमन दलाचा कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो? गोठ्याला लागलेल्या या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात साधारण सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आगीत दोन म्हशी जखमी झाल्या आहेत. तर गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार, कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटना स्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबानी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.















Discussion about this post