मुंबई | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता वाढल्यानंतर अखेर त्यांनी क्रीडमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी त्यांच्या राजीनाम्याला मान्यता दिली आहे. यानुसार, कोकाटे यांच्याकडील सर्व खाती तात्पुरत्या स्वरूपात अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आली असताना त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी एका बड्या मंत्र्याची विकेट पडणार असल्याचे सूचक ट्वीट केले आहे.
मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…!
वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’…— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
रोहित पवार यांचे ट्वीट
“मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण माणिकराव कोकाटे यांच्याकडून असे करणंच चुकीचं आहे,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे. या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा आहे. आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असे पवार म्हणाले आहेत.















Discussion about this post