जळगाव : गोहिल्स जेके कराओके प्रस्तुत ‘रिमझिम गिरे सावन’ या Monsoon Special Songs विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. रोटरी भवन, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
पावसाळी वातावरणाला साजेशा हिंदी चित्रपट गीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमात जितेंद्र गोहिल आणि केतकी गोहिल यांच्यासह शहरातील नामवंत गायक-गायिका आपल्या गायनाने रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
या संगीत मैफलीत चंद्रशेखर चोपडेकर, कैलास खैरनार, रशीद सालार, राजेश बगे, प्राजक्ता केदार, आरती मोरे, सचिन कुलकर्णी आणि सैय्यद रशीद हे गायक-गायिका सहभागी होणार आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या-नव्या हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गीतांचा आनंद रसिकांना घेता येणार असून, संगीतप्रेमींसाठी ही विशेष मैफल ठरणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असून, कार्यक्रम वेळेवर सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. जळगावातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.















Discussion about this post