जळगाव/मुंबई । राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग तीव्र संकटात सापडला असून सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता बळीराजासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असून,पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ तर काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’, तर इतर २० जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हिंगोली, नांदेड, वर्धा, भंडारा, गोंदिया, जालना, बीड आणि धाराशिवसह राज्यातील इतर २० जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याची हवामानाची स्थिती आणि ‘यलो अलर्ट’
जळगाव जिल्ह्यातही मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठीही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात जमिनीलगत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या बदलामुळे आणि वादळी वाऱ्यांच्या शक्यतेमुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, मात्र बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व नागरिकांनी हवामानाच्या या अंदाजामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.















Discussion about this post