रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती सेलने भरती जाहीर केली आहे. पूर्व रेल्वेने गोरखपुर येथे अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार असून याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ११०४ जागा भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
रेल्वे भरती सेलने नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी-बारावी पास केले असावे. याचसोबत त्यांच्याकडे आयटीआय सर्टिफिकेटदेखील असावे. जर तुम्ही आयटीआय शिक्षण पूर्ण केले असेल तरच तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. याचसोबत राखीव प्रवर्ग, महिला आणि दिव्यांगाना कोणतेही शुल्क भरायचे नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्वात आधी www.ner.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्ही तुमची सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन करा.
यानंतर लॉग इन करुन माहिती भरा आणि कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post