नवी दिल्ली । ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता तृणमूल काँग्रेसवर संकट ओढवले असून, भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन पक्ष फोडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

देशातील लोकशाहीच्या सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर (X) खात्यावरून केंद्र सरकार व आयोगाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.

पहले शिवसेना, फिर NCP और अब तृणमूल कांग्रेस।
हर बार एक ही पैटर्न – BJP और चुनाव आयोग मिलकर एक पार्टी को तोड़ते हैं। फिर उसका चुनाव चिन्ह छीन लिया जाता है।
जब पूरी की पूरी पार्टी चोरी हो सकती है, तो करोड़ों भारतीयों के वोट चोरी होना भी हैरानी की बात नहीं।
वोट चोरी। सरकार चोरी।…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2026
राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमंक काय म्हटले?
आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी (NCP) आणि आता तृणमूल काँग्रेस (TMC). प्रत्येकवेळी तोच तोच पॅटर्न – भाजप आणि निवडणूक आयोग मिळून एक पक्ष फोडतात आणि नंतर त्या पक्षाचे अधिकृत चिन्हच हिरावून घेतात. जेव्हा संपूर्ण पक्षच्या पक्षच चोरला जाऊ शकतो, तेव्हा करोडो भारतीयांची मते चोरली जाणे यात काहीच नवल नाही. मते चोरीला जाणे, सरकार चोरीला जाणे आणि आता अख्खा पक्षच चोरला जाणे – ही आपल्या लोकशाहीच्या अधोगतीची चिन्हे बनली आहेत.
जनतेच्या कौलाचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची (ECI) घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, याउलट ते जनता जनार्दनाचा कौलच बदलून टाकणाऱ्या शक्तींना मदत करत आहेत.ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची एकट्याची नाही. ही लढाई अशा प्रत्येक राजकीय पक्षाची आणि देशातील प्रत्येक मतदाराची आहे, ज्यांना देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत.















Discussion about this post