चाळीसगाव । चाळीसगाव आणि जळगाव शहरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याची अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी सलग दोन कारवाया करत तस्करांना मोठा दणका दिला आहे. चाळीसगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवायांमध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ आणि आयशर वाहन असा एकूण १६ लाख ९९ हजार ८९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हिरापूर रोडवर प्रतिबंधित गुटखा जप्त

चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिरापूर रोड परिसरात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी निखिलेश सुनील केवळे (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाला आढळून आला.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशरमधून गुटख्याची वाहतूक
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई केली. या कारवाईत मधुकर धाडू इमके (वय ४८, रा. खेडी, शिवनगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील MH-48-AY-2468 क्रमांकाच्या आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आला. पोलिसांनी वाहनासह संबंधित मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३२/२०२६ अन्वये संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाया पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी केल्या















Discussion about this post