जळगाव | जळगाव जिल्ह्यातील कृषी उद्योजक, निर्यातदार तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) यांच्यासाठी बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (DGFT), मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त आवाहनातून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

“ए-पी-ई-डी-एज रोल इन एक्सपोर्ट प्रमोशन ऑफ ॲग्री अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स” या विषयावर आयोजित करण्यात येणाऱ्या या वेबिनारमध्ये कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या निर्यात संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

वेबिनारसाठी सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दिलेल्या नोंदणी लिंकवर पूर्वनोंदणी करावी. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक : https://forms.gle/QeDtBTJAMpCEzre58
ऑनलाइन वेबिनारची तारीख ३० सप्टेंबर २०२६, वेळ दुपारी ४ ते ५ अशी असून, वेबिनारचे माध्यम ऑनलाइन राहणार आहे. वेबिनारसाठी Webex Meeting Number : 2642 777 0379 असून, Meeting Password : DGFT@2026 आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त कृषी उद्योजक, निर्यातदार व MSME उद्योजकांनी या वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post