जळगाव : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.), जळगाव अंतर्गत वेबसाईटवर एनएसकेएफडीसी कर्ज योजने अंतर्गत सन २०२३ मध्ये ऑनलाईन कर्ज प्रस्ताव सादर केलेल्या अर्जदारांनी येत्या आठ दिवसांच्या आत आवश्यक मूळ कागदपत्रांसह महामंडळाच्या जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत एकूण ८१ कर्ज प्रस्ताव ऑनलाईन नोंदविण्यात आले असून ८२ प्रस्तावांची पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. मात्र, अद्याप अनेक अर्जदारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे महामंडळाकडे सादर केलेली नाहीत. त्यामुळे प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित ऑनलाईन कर्ज प्रस्ताव रद्द करण्यात येतील. तसेच कागदपत्रे सादर न करणाऱ्या अर्जदारांना कर्जाची आवश्यकता नसल्याचे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













Discussion about this post