Saturday, November 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर ; तब्बल १६७१७ पदांसाठी महाभरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2026
in नोकरी
0
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत भरती होणाऱ्या पदांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली असून, आता एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीत लिपिक-टंकलेखक पदांसाठी सर्वाधिक ३ हजार ९६६ जागा, तर तलाठी पदांसाठी १ हजार ८४० जागा उपलब्ध झाल्या आहेत. वाढीव जागांमुळे हजारो उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदसंख्या वाढीसंदर्भात नवीन पत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सरकारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत व्हावी, यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. त्यानंतर विविध शासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रांच्या आधारे पदसंख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२५ प्रशासकीय विभागांत १६,७१७ पदांची भरती

आयोगाच्या नव्या पत्रकानुसार, राज्यातील २५ प्रशासकीय विभागांमध्ये एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखक पदांसाठी सर्वाधिक ३ हजार ९६६ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागात ३ हजार ९११ पदांची भरती होणार आहे. तर महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदांसाठी १ हजार ८४० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या भरतीमध्ये विविध पदांसाठी सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षणानुसार जागांचा तपशीलही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना आपल्या प्रवर्गानुसार उपलब्ध पदांची माहिती घेता येणार आहे.

वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत; अर्जाची पुन्हा संधी

या भरती प्रक्रियेत उमेदवारांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाढीव पदांमुळे उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची किंवा पदांचे विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार, १३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना वाढीव पदांचा विचार करून आवश्यक बदल करता येतील.

असा करा ऑनलाइन अर्ज

इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर ‘ONLINE FACILITIES’ मधील ‘Online Application System’ हा पर्याय निवडावा. नवीन उमेदवारांनी ‘New User Registration’ करून नोंदणी पूर्ण करावी, तर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या लॉगिनद्वारे प्रवेश करावा. त्यानंतर ‘Online Application’ मध्ये जाऊन महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एसआयआरबाबत महाराष्ट्रासाठी निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय! तातडीने नवा आदेश जारी, आता थेट

Next Post

महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव! सकाळी थंडी, दुपारी उकाडा; जळगावकरांना दुहेरी वातावरणाचा अनुभव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव! सकाळी थंडी, दुपारी उकाडा; जळगावकरांना दुहेरी वातावरणाचा अनुभव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

November 7, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

नंदूरबारमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी; स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने

November 7, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सलग 5 दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार

November 7, 2026
गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

November 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page