Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

एमआयडीसी पोलिसांकडून गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; आयशर वाहनासह ६१ सिलेंडर जप्त 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 21, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
एमआयडीसी पोलिसांकडून गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; आयशर वाहनासह ६१ सिलेंडर जप्त 
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गॅस सिलेंडर चोरीच्या प्रकरणाचा अखेर एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी तपास करून पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका ठिकाणाहून गॅस सिलेंडर चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक केली.  त्यांच्याकडून चोरी झालेले ६१ सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे. जप्त मालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख २२ हजार रुपये आहे.
शुक्रवार (दि.14) रोजी फिर्यादी यांनी भारत पेट्रोलियम, जळगाव येथून रिफिल केलेले ३४२ सिलेंडर ट्रकद्वारे एमआयडीसी परिसरात रात्री पार्क केले होते. शनिवार (दि.15) रोजी सकाळी ते वाहन घेण्यासाठी पोहोचले असता ट्रक रस्त्याच्या कडेला उभा दिसला, परंतु त्यातील ६१ सिलेंडर गायब असल्याचे आढळले. चोरी झालेल्या सिलेंडरची किंमत १ लाख २२ हजार रुपये होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ८४८/२०२५, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे मंगळवार (दि.18) रोजी एमआयडीसी भागात सापळा रचण्यात येऊन मुख्य आरोपी शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीच्या चौकशीत त्याने साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून सर्व 61 सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे 5 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अधिकारी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद, किरण चौधरी, नितीन ठाकुर, किरण पाटील आणि शशिकांत मराठे यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

थंडीचा जोर ओसरणार! महाराष्ट्रात ‘या’ तारखांना पावसाची शक्यता 

Next Post

तरुणाच्या हत्येने जळगाव जिल्हा पुन्हा हादरला ! चाकूने भोसकून हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

तरुणाच्या हत्येने जळगाव जिल्हा पुन्हा हादरला ! चाकूने भोसकून हत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरणार’? २ ते ४ मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार?

February 13, 2026
तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! विविध बँकांमध्ये होणार मोठी पदभरती

सरकारी बँकेत २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती ; अर्जाची शेवटची तारीख जवळ आली

February 13, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासनाचा सुधारित अध्यादेश; नव्या नियमांवरून वाद पेटला, वाचा काय आहे नवा पेच

February 13, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

थंडी झाली गायब ! फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page