जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चौधरी यांच्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे शिवसेनेचा दुसरा तर महायुतीचा तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया सुरू झालीय. अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर बुधवारी भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध विजयी झाल्या. भाजपनंतर आता शिवसेनेनेही खातं उघडलंय. शिंदेसेनेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे हे १८ मधून बिनविरोध विजयी झालेत.
यांनतर यानंतर प्रभाग क्रमांक ९ मधून माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.यामुळे महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.















Discussion about this post