तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
महावितरणने 180 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
रिक्त पदांची आणि पगार
या भरती अंतर्गत 180 पदे रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही भरती परीक्षा ऑगस्ट महिन्यात ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. या भरतीतून निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाच्या अनुभव आणि दर्जानुसार मासिक 73,580 ते 1,66,555 रुपये इतके आकर्षक वेतन दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल शाखेत BE किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. तसेच पदाच्या प्रकारानुसार 35 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षणाच्या नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सूट लागू असेल.
अर्ज कसा कराल
अधिकृत संकेतस्थळावर जा – http://www.mahadiscom.in
New Regisration वर क्लिक करा
आवश्यक माहिती भरून खाते तयार करा
लॉगिन करुन अर्ज करा
फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.















Discussion about this post