Wednesday, August 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

FSSAI ची मोठी कारवाई! ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजसह अनेक मद्य ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 4, 2026
in राष्ट्रीय
0
FSSAI ची मोठी कारवाई! ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजसह अनेक मद्य ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मद्य उद्योगावर मोठी कारवाई करत काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्ल्यू आणि रॉयल चॅलेंज यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या काही उत्पादनांमध्ये अन्न सुरक्षा आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याचा दावा FSSAI ने केला आहे.

FSSAI च्या तपासणी आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये काही कंपन्या रम आणि व्हिस्कीमध्ये नैसर्गिक प्रक्रियेतून स्वाद विकसित करण्याऐवजी बाह्य किंवा कृत्रिम फ्लेवर मिसळत असल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार रम व व्हिस्कीचा स्वाद हा कच्चा माल, आंबवणे, ऊर्ध्वपातन आणि परिपक्वता (Aging) या प्रक्रियेतून नैसर्गिकरित्या तयार झाला पाहिजे. मात्र, काही उत्पादक न्यूट्रल अल्कोहोलमध्ये कृत्रिम स्वाद मिसळून ती उत्पादने सामान्य रम किंवा व्हिस्की म्हणून विकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

FSSAI च्या म्हणण्यानुसार, अशा उत्पादनांवर “Rum Flavoured Spirit” किंवा “Whisky Flavoured Spirit” असे स्पष्ट लेबल असणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित उत्पादनांच्या पॅकेजिंगवर ही माहिती न देता ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तपासादरम्यान Old Monk XXX Rum च्या एका व्हेरिएंटवरील “7 Years Old Blended” हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे FSSAI ने म्हटले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या उत्पादनामध्ये प्रामुख्याने न्यूट्रल स्पिरिट असून, परिपक्व रम स्पिरिटचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. नियमांनुसार मिश्रणातील सर्वात कमी वयाच्या स्पिरिटच्या आधारेच वयाचा उल्लेख करणे आवश्यक असते.

या मद्यांवर बंदी

प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे, प्राधिकरणाने मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरच्या ओल्ड मॉन्क व्हेरिएंट्स, युनायटेड स्पिरिट्सच्या मॅकडॉवेल्स नं. 1 रम, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रू बेवरेजेसच्या बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रम आणि असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीजच्या सेंट्रल प्रोव्हिन्स व्हिस्की आणि मॅकडॉवेल्स नं. 1 सेलिब्रेशन मॅच्युअर XXX रम यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

“बिहारची जनता भाजपला कंटाळलीय ” ; बांकीपूर निवडणुकीवरून प्रियंका गांधींची टीका

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय! शेतकऱ्यांच्या ‘या’ योजनेला ३ वर्षांची मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 8 महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय! शेतकऱ्यांच्या 'या' योजनेला ३ वर्षांची मुदतवाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची चांगली संधी! यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

युनियन बँक ऑफ इंडियात विविध पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा

August 12, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोन्या-चांदीचे भाव भडकले! १० दिवसांत सोन्यात ९,५०० तर चांदीत १८ हजारांची उसळी

August 12, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

‘मुलं ही पालकांची मालमत्ता नाही’; प्रौढ मुलीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा मोठा निकाल

August 12, 2026
गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

August 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page