Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 11, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक
बातमी शेअर करा..!

जळगाव | लाचखोरीच्या प्रकरणात आधीच चौकशीच्या फेऱ्यात असलेले अकोला येथील जिल्हा उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एसीबीने सील केलेल्या जळगावातील त्यांच्या घराशी संबंधित कथित चोरीच्या कटप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी किरण चौधरी यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई करत जळगावातील त्यांचे निवासस्थान सील केले होते. तपासाच्या अनुषंगाने या घरातील मालमत्ता सुरक्षित ठेवण्यात आली होती.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास दोन संशयित युवक सीलबंद घराच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या हाती लागले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांची चौकशी केली. चौकशीत या प्रकारामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक बळावल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सीलबंद घरातील रोकड आणि मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप किरण चौधरी यांच्यावर करण्यात आला आहे. या कटात त्यांचे शालक मनोज झोपे याचीही भूमिका असल्याचे तपासात समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात किरण चौधरी आणि मनोज झोपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी मनोज झोपे अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लाचखोरीच्या चौकशीदरम्यान सीलबंद करण्यात आलेल्या घराशी संबंधित या नव्या गुन्ह्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘लाडकी बहीण’ योजनेवर कॅगचा ताशेरे; बजेटपेक्षा ₹३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च, सरकार अडचणीत?

Next Post

पाऊस पडला तरी जळगाव जिल्ह्यातील टंचाई कायम; अजूनही ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावसह दहा जिल्ह्यांतील गावांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

पाऊस पडला तरी जळगाव जिल्ह्यातील टंचाई कायम; अजूनही ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

अविवाहित मुलीच्या पोटगीबाबत मोठा निर्णय; उच्च न्यायालयाने काय सांगितले?

October 17, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

महाराष्ट्रात २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा अंदाज

October 17, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page