Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न
बातमी शेअर करा..!

खत, बी, बियाणेसह कंपनीकडून लिंकिंग केल्यास जिल्ह्यात होणार सक्त कारवाई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव । जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी, बियाणे याबाबत कोणतीही लिंकिंग केल्यास संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.याबरोबरच बनावट बियाणे विरोधात कारवाईसाठी जिल्ह्यात 15 तालुक्यात प्रत्येकी एक आणि जिल्हास्तरावर एक असे एकूण 16 भरारी पथक स्थापन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्ह्यातील जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असून टंचाई होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, खत-बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील खरीप हंगामासाठीची पेरणी क्षेत्र, बियाणे व खते उपलब्धता, सिंचन सुविधा, पीककर्ज वाटप, फळबाग लागवड, पीक विमा योजना आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात यंदा 7.69 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार असून, त्यापैकी 5.05 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी आरक्षित आहे.

पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश :
बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
हवामान यंत्रणा अद्ययावत करून आवश्यक ठिकाणी नवीन यंत्रे बसवावीत. सध्या जिल्ह्यात 86 स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत असून, आणखी 24 ठिकाणी केंद्रे उभारली जाणार आहेत.
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, 251 कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी 3.39 लाख मेट्रिक टन रासायनिक खत मंजूर असून, सध्या 1.45 लाख मेट्रिक टन खताचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा नियोजनबद्ध व वेळेत पुरवठा सुनिश्चित करावा.
शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी 1800 233 4000 हा टोल फ्री क्रमांक प्रभावीपणे कार्यान्वित ठेवावा.
“एक अधिकारी, एक गाव” अभियानांतर्गत जनजागृती शिबिरे आयोजित करावीत.
आधुनिक शेतीबाबत कार्यशाळा घेऊन पारंपरिक शेतीतून आधुनिकतेकडे वाटचाल करावी.
“कुकुंबर मोझॅक व्हायरस” संदर्भात पावसाळी हंगामात जनजागृती मोहीम राबवावी.
“एक जिल्हा – एक पिक” (केळी प्रक्रिया आधारित) या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.

बैठकीत आत्महत्याग्रस्त व अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मोफत बियाणे व खते देण्यासंदर्भातील कार्यवाही, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, ठिबक सिंचनाचे अनुदान, गाळमुक्त धरण-जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी, मनरेगाअंतर्गत कामे, तसेच सौर कृषी पंप जोडणीस गती देण्याबाबत सखोल चर्चा झाली.

महावितरण विभागाला शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. बागायती कपाशी पिकासाठी खराब ट्रान्सफॉर्मर व पोल तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेशही देण्यात आले.

शेतकरी बांधवांसाठी पालकमंत्र्यांचे आवाहन :
उष्णतेपासून बचावासाठी सकाळी लवकर शेतीची कामे पूर्ण करावीत. 100 मिमी पावसाच्या नोंदीनंतरच पेरणी करावी. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी व धूळपेरणी टाळावी. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करावा व जैविक खतांना प्राधान्य द्यावे. बोगस कंपन्यांपासून सावध राहून बी-बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले.

आ. अमोल पाटील व आ. अमोल जावळे यांनीही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत, बोगस कंपन्यांविरोधात तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावर कृषी विभागाने राज्यस्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत दिले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी खरीप हंगामाचे पूर्ण नियोजनाचे सादरीकरण केले

बातमी शेअर करा..!
Previous Post

“संजय राऊत महालोफर” ; मंत्री गुलाबराव पाटीलांची टीका

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक पतयोजनाचे प्रकाशन संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक पतयोजनाचे प्रकाशन संपन्न

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक पतयोजनाचे प्रकाशन संपन्न

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात लग्नाच्या सहाव्याच दिवशी नववधूचा भीषण अपघातात मृत्यू; माहेरी जाताना काळाचा घाला

जळगावात लग्नाच्या सहाव्याच दिवशी नववधूचा भीषण अपघातात मृत्यू; माहेरी जाताना काळाचा घाला

July 13, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात १५ जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 13, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page