Tuesday, August 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बलांचा मोठा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 18, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे, यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा आज पाचवा दिवस आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षांनी आपल्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडल्याचा दावा सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान केला.

कपिल सिब्बल यांनी दहाव्या अनुसूचीअंतर्गत विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष एखाद्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत बाबींवर आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच पक्षाच्या घटनेचा विचार न करता घेतलेल्या निर्णयांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सिब्बल यांनी युक्तिवाद करताना विधानसभा अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीतील अधिकारक्षेत्राच्या मर्यादेपलीकडे जाऊन निर्णय घेतल्याचा दावा केला. राजकीय पक्षातील नेतृत्वबदलाकडे दुर्लक्ष करून विधिमंडळ पक्षातील बहुमताला महत्त्व देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. “अध्यक्षांनी पक्षाचे संविधान का लक्षात घेतले नाही?” असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन्हींच्या भूमिकांमध्ये फरक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या युक्तिवादातून ठाकरे गटाची बाजू मांडली.

सुनावणीदरम्यान भरतशेठ गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून कोणत्या अधिकारातून मान्यता देण्यात आली, असा थेट सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड केले. त्यानंतर ३ जुलै २०२२ रोजी राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरून तसेच मुख्य प्रतोद पदावरून वाद निर्माण झाला. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचा नेता आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली होती.या निर्णयांनाच ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही आव्हान

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा वाद निवडणूक आयोगापर्यंतही पोहोचला होता. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यानंतर १० जानेवारी २०२४ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका फेटाळून शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला होता.या दोन्ही निर्णयांना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

पक्ष महत्त्वाचा की विधिमंडळ पक्षाचे बहुमत?

सुनावणीदरम्यान राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. पक्षाचा निर्णय महत्त्वाचा की विधिमंडळ पक्षातील बहुमत, यावरून दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष आणि चिन्हासह आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुकान बंद करून घरी जाताना व्यापाऱ्याला लुटले; मिरचीपूड डोळ्यात फेकून लाखोंची रोकड लंपास

Next Post

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार

‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार

August 18, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सणासुदीच्या तोंडावर चांदीच्या दरात मोठी घसरण; जळगावात आजचे सोने-चांदीचे भाव किती?

August 18, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे १० निर्णय ; वाचा कोण-कोणते आहेत?

August 18, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page