मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरात काही जण घरामध्ये बसून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्तरीत्या माहितीची पडताळणी करून संबंधित ठिकाणी धाड टाकली.
छाप्यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि ऑनलाईन सट्ट्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही आणि साउंड बार तसेच ४१ एटीएम कार्ड जप्त केले. या सर्वांसह एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणात देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी हे सर्व जामनेर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ नुसार पुढील तपास सुरू आहे. आयपीएलच्या हंगामात ऑनलाईन सट्टेबाजी वाढत असल्याने पोलिसांकडून अशा बेकायदेशीर प्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.















Discussion about this post