जळगाव | जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीत चमक दिसली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोने दिवाळीपूर्वीच सव्वा लाखाच्या घरात पोहचल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला.
सणासुदीचा काळ सुरू होताच सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतात असून दिवाळी जवळ येत असल्याने वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी खात्री बसली आहे तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेसह देशांतर्गत मागणीमुळे सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरातही सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ८०६ रुपयांच्या उच्चांकावर होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा ७२१ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह एक लाख २४ हजार ५२७ रुपयांचा नवीन उच्चांक केला. बुधवारी पुन्हा १४४२ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार ९६९ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
चांदीचे दर स्थिर
शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५५ हजार ५३० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्यानंतर चांदीने एक लाख ५६ हजार ५६० रूपयांचा नवीन उच्चांक केला. बुधवारी सकाळी दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. परिणामी, चांदीचे दर स्थिर राहिले.















Discussion about this post