जळगाव । राज्यातील काही भागात परतीच्या पावसाचा जोर दिसून येणार आहे. मात्र सध्या काही ठिकाणी पावसाने उसंती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात दोन ते तीन वेळा मुसळधार वृष्टीमुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.
यानंतर गतपाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी ऑक्टोबर हिटचा सामना जळगावकरांना करावा लागतो आहे. आता ८ ऑक्टोबरपर्यंत तापमानात देखील सातत्याने वाढ होणार आहे. रविवारी ३४ अंशावर असलेला पारा ८ ऑक्टोबरपर्यंत ३८ अंशावर पोहोचणार आहे.
त्यामुळे उकाड्याचा सामना करावा लागेल. दुसरीकडे प्रशांत महासागरात ‘इनव्हेसट ९९ एल’ नावाचे वादळ उठलेले आहे. या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्र किनाऱ्यावरील भागांमध्ये पावसाची शक्यता वाढली आहे. परंतु, हे वादळ इतर ठिकाणी ढग निर्माण करणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे सध्या तरी आठ दिवसात पाऊस येण्याची शक्यता नाही अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.















Discussion about this post