जळगाव । ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबादसाठी विमानसेवा सुरु आहे. यांनतर आता जळगावहुन मुंबई, अहमदाबाद अवघ्या काही तासात गाठता येणार आहे.
जळगाव विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे. याबरोबरच दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाली आहे.
ही सेवा ऑगस्टपासून बंद होती. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पुन्हा सुरू झाली असून, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशा आठवड्यातील चार दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. दिवाळीच्या सणापूर्वी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.















Discussion about this post