Friday, November 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नोकरी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय ; पगार, सुट्टी आणि कामाच्या तासांबाबत मोठे बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2026
in महाराष्ट्र
0
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी
बातमी शेअर करा..!

मुंबई । खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने वेतन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. ‘महाराष्ट्र वेतन नियम, २०२६’ या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेपासून ते पगाराच्या पावतीपर्यंत अनेक बाबींमध्ये बदल करण्यात आले आहेत. ५ नोव्हेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत अधिक संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.

कामाच्या वेळेवर मर्यादा निश्चित

नव्या व्यवस्थेनुसार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबाबत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. दिवसातील कामाचे प्रमाणित तास ८ निश्चित करण्यात आले असून, आठवड्याचे एकूण काम ४८ तासांच्या मर्यादेत ठेवण्याची तरतूद आहे. यासोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अतिरिक्त मोबदला

कर्मचाऱ्याला साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावल्यास त्याला नियमानुसार बदली विश्रांती देण्याची तरतूद आहे. तसेच लागू असलेल्या परिस्थितीत अतिरिक्त कामासाठी सामान्य वेतनदराच्या किमान दुप्पट दराने मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळू शकणार आहे.

वेतनातून होणाऱ्या कपातीवर निर्बंध

अनेकदा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून वेगवेगळ्या प्रकारच्या कपाती केल्या जातात. मात्र, नव्या नियमांनुसार एका वेतन कालावधीत एकूण कपातीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. कर्मचाऱ्यांकडून दंड किंवा नुकसानीची रक्कम वसूल करण्यापूर्वी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देणेही आवश्यक असेल.

प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार सॅलरी स्लिप

पगार किती मिळाला आणि कोणत्या कारणासाठी किती रक्कम कापली, याची माहिती आता कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. यासाठी नियोक्त्याला प्रत्येक वेतनाच्या दिवशी किंवा त्याआधी कर्मचाऱ्याला डिजिटल अथवा लेखी स्वरूपात सॅलरी स्लिप द्यावी लागणार आहे. याशिवाय वेतन आणि उपस्थितीशी संबंधित नोंदी किमान पाच वर्षे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही नियोक्त्यावर असेल.

वेतनाबाबत अन्याय झाल्यास तक्रार करता येणार

कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळणे, पगारातून चुकीची कपात होणे किंवा महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या वेतनात भेदभाव होणे अशा प्रकारांविरोधात तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित कामगार विभागाकडे तक्रार करून कर्मचाऱ्यांना न्याय मागता येणार आहे. आवश्यकतेनुसार कामगार संघटना आणि संबंधित निरीक्षकांची मदतही घेता येईल.

नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित व्यवहार अधिक स्पष्ट होण्याबरोबरच कामाचे तास, साप्ताहिक विश्रांती आणि पगारातील कपातीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांपर्यंत कितपत पोहोचतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारचे टेन्शन वाढले! कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय; आता थेट..

Next Post

आसाम रायफल्समध्ये ३५४ पदांची भरती; १०वी, १२वी, ITI उत्तीर्णांना संधी, असा करा अर्ज!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आसाम रायफल्समध्ये ३५० हून अधिक पदांसाठी भरती; १०वी, १२वी, ITI, डिप्लोमाधारकांसाठी मोठी संधी

आसाम रायफल्समध्ये ३५४ पदांची भरती; १०वी, १२वी, ITI उत्तीर्णांना संधी, असा करा अर्ज!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा, पण..; रोहित पवारांचं सरकारला थेट आव्हान

November 20, 2026
जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

November 20, 2026
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ३१९ जागांसाठी भरती

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page