Wednesday, June 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तिकीट हुकल्याची खदखद पुन्हा उफाळली? गुलाबराव पाटील म्हणाले; “नसीब में होगा तो उचलकर आयेगा…”

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 3, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात शेरोशायरीच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही. पण मी एवढंच सांगतो, नसीब में होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा. देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगलं होणार असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी भावना बोलून दाखवल्या.

जळगाव विधान परिषद जागेसाठी गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतल्याचेही सांगितले जाते. मात्र महायुतीतील जागावाटपात ही जागा भाजपकडे कायम राहिल्याने त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या गुलाबराव पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अंतिम निर्णय भाजपच्या बाजूने गेल्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

अर्ज भरताना गैरहजेरीची चर्चा

महायुतीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना गुलाबराव पाटील अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे जळगावातील महायुतीच्या राजकारणात पडद्यामागे अस्वस्थता असल्याची चर्चा रंगली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAI कार्गो लॉजिस्टिक्स’मध्ये १५८ जागांसाठी मेगा भरती

Next Post

विधान परिषद निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; दोन बडे नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

विधान परिषद निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; दोन बडे नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

June 3, 2026
मालेगावहून परतताना भीषण अपघात; चाळीसगावातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांसह पाच जण जखमी

मालेगावहून परतताना भीषण अपघात; चाळीसगावातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांसह पाच जण जखमी

June 3, 2026
१२ वीच्या निकालात मोठा घोळ! बोर्डाने घेतला ‘हा’ तातडीचा निर्णय

१२ वीच्या निकालात मोठा घोळ! बोर्डाने घेतला ‘हा’ तातडीचा निर्णय

June 3, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

विधान परिषद निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; दोन बडे नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये

June 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page