Tuesday, August 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ग्रामसभेत तुफान राडा! ग्रामसेवकाला बेदम मारहाण, जीव वाचवताना मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
ग्रामसभेत तुफान राडा! ग्रामसेवकाला बेदम मारहाण, जीव वाचवताना मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामसेवकावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या बिलांच्या मंजुरीवरून झालेल्या वादातून सात जणांनी ग्रामसेवकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीतून जीव वाचवण्यासाठी पळत असताना ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याच आरोप आहे

मृत ग्रामसेवकाचे नाव प्रल्हाद पाटील (वय ५२) असे आहे. ही घटना १७ ऑगस्ट रोजी शिवरे येथे घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका संशयित मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ग्रामसभेत वादाचे रूपांतर हाणामारीत

मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथे ग्रामसभा सुरू असताना जुन्या बिलांना मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरून प्रल्हाद पाटील यांच्यासोबत काही जणांचा वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.आरोपानुसार, सात जणांनी पाटील यांना घेरून शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी तपासाला वेग देत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी (१८ ऑगस्ट) त्यांच्या मूळ गावी बोधर्दे (ता. पारोळा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बोधर्दे आणि शिवरे परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकावर ग्रामसभेतच जीवघेणा हल्ला झाल्याने या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

७ हजाराची लाच घेताना जळगाव आरटीओतील एजंटला अटक

Next Post

दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेलाही स्थगिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेलाही स्थगिती

दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेलाही स्थगिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 18, 2026
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बलांचा मोठा दावा

August 18, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दुकान बंद करून घरी जाताना व्यापाऱ्याला लुटले; मिरचीपूड डोळ्यात फेकून लाखोंची रोकड लंपास

August 18, 2026
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; विविध पदांच्या ४७० पदांवर भरती

August 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page