Wednesday, September 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 9, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील निवडणुका रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प होऊ नये आणि ग्रामस्थांना आवश्यक सेवा सुरळीत मिळत राहाव्यात, यासाठी आता या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू राहणार आहे.

ग्रामविकास विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी विस्तार अधिकाऱ्यांसह अन्य पात्र शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य, शिक्षण आणि पंचायत यांच्यासह आवश्यकतेनुसार इतर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे.

निवडणूक होईपर्यंत कारभार सुरळीत

अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर विविध प्रशासकीय कारणांमुळे निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामे, ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि दैनंदिन प्रशासकीय निर्णयांवर परिणाम होण्याची शक्यता होती. सरकारच्या या निर्णयामुळे अशा ग्रामपंचायतींचा कारभार नियमितपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशासकांचा कालावधी कमाल सहा महिन्यांचा राहणार आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया त्यापूर्वी पूर्ण झाल्यास प्रशासकाचा कार्यकाळ त्याच वेळी संपुष्टात येईल. म्हणजेच राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रशासक कारभार पाहणार आहेत.

विकासकामांना मिळणार गती

ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने गावांमधील विविध विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय प्रभावित होऊ नयेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरी सुविधा तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यास प्रशासकीय व्यवस्था उपयोगी ठरणार आहे.

सरपंच परिषदेच्या मागणीला यश

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत करण्यासाठी सरपंच परिषदेने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली होती. या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा झाल्यानंतर आता ग्रामविकास विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय पोकळी निर्माण होणार नाही. निवडणुका पूर्ण होईपर्यंत गावांचा कारभार नियमितपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी आता प्रशासकांवर राहणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

September 9, 2026
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

September 9, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

September 9, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

September 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page