जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ९ हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
आजच्या घसरणीनंतर जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २४ हजार रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा भावही कमी होऊन प्रतिकिलो १ लाख ५५ हजार रुपयांवर पोहोचला आहे.मागील काही दिवसापासून सोने चांदी दरात सातत्याने घसरण होताना दिसत असून या घसरणीमुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता, डॉलरची मजबुती आणि बॉण्डवरील परतावा वाढल्याने गुंतवणूकदार सोन्या-चांदीपासून दूर जात आहेत. याचाच परिणाम जागतिक बाजारासह जळगावच्या सराफा बाजारातही दिसून येत आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे















Discussion about this post