जळगाव । जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गाडेगाव जवळ असलेल्या सुप्रीम कंपनीसमोर पंधरा ते वीस अज्ञात तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या तरुणांनी महामार्गावर गाड्या अडवत थेट गाड्यांवर दगडफेक केल्याचा आरोप हा वाहनधारकांनी केला आहे. दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून अज्ञात तरुणांविरोधात वाहन चालकांनी पोलीस हा तक्रार केली आहे.
या घटनेत 15 ते 20 अर्धनग्न तरुण हातात तलवारी घेतल्या होत्या. या तरुणांनी अंडी आणि दगडफेक करत गाड्यांवर हल्ला केला. यात अनेक वाहनांचे काचा फुटल्या असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिक तसेच महिलांनी दिली. याबाबत रस्त्यावरून याबाबत या महामार्गावरून जात असलेल्या काही नागरिकांनी पोलिसात तक्रार देत कारवाईची मागणी केलीय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० तरुण सुप्रीम कंपनीच्या पुढे दबा धरून बसले होते. महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर त्यांनी दगडफेक केली. तर काही गाड्यांवर अंडी फेकली. यात वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.















Discussion about this post