धुळे: अन्न व औषध प्रशासनाने धुळ्यात अवैध गुटख्यावर मोठी कारवाई केली. धुळे शहरातील वल्लीपुरा मौलवी गंज परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई नाशिक गुप्तचर विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने व मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केली आहे.
आझाद नगर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गोडाऊनवर छापा टाकला असता, मिराज, रजनीगंधा, विमल, राजनिवास यांसारख्या विविध ब्रँडच्या गुटखा व पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणातसाठा आढळून आला. महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पानमसाला विक्री, वाहतूक व साठवणुकीस बंदी घातली असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा करण्यात आला होता.
सदर गोडाऊन सील करण्याची प्रक्रिया सुरू असून, जप्त केलेल्या मालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुढील तपास सुरू केला असून, गोडाऊनच्या मालकाविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.















Discussion about this post