ग्रामशाखा फलक अनावरण व नूतन श्रामणेरांचा ही होणार सत्कार
जळगाव : भारतीय बौद्ध महासभा, जळगाव जिल्हा (पूर्व) अंतर्गत जळगाव तालुका पुरुष व महिला शाखा आणि गाढोदा महिला ग्रामशाखेच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धम्म प्रवचन मालिकेचा सांगता सोहळा, गाढोदा महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण तसेच नूतन श्रामणेरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता पंचशील नगर, गाढोदा, ता. जि. जळगाव येथे होणार आहे.
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या जळगाव तालुका शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, धम्म उपासक-उपासिका तसेच ग्रामशाखांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव तालुकाध्यक्ष राजेश नामदेव इंगळे राहणार आहेत.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे, जिल्हाध्यक्ष सुमंगल अहिरे, जिल्हा सरचिटणीस सुशिलकुमार हिवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संजीव साळवे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष रविंद्र वानखेडे आणि जिल्हा हिशेब तपासनीस पी. डी. सपकाळे हे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष रमेश साळवे, केंद्रीय शिक्षक तथा जळगाव प्रभारी व जिल्हा संघटक बी. एस. पवार, जिल्हा संस्कार सचिव भीमराव पवार, जिल्हा संघटक सुभाष सपकाळे, महिला जिल्हा सचिव (पर्यटन) विद्या झनके, केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव, महिला जिल्हा कार्यकारिणी सचिव सुषमा इंगळे, महिला तालुकाध्यक्ष ज्योती दाभाडे, तालुका सरचिटणीस सागर सदावर्ते, तालुका कोषाध्यक्ष यशवंत जाधव, तालुका उपाध्यक्ष (संस्कार) जगदीश सपकाळे, तालुका पर्यटन सचिव उपाध्यक्ष जयपाल धुरंधर, तालुका सचिव गौतम बाबुलाल सपकाळे, तालुका सचिव (संस्कार) किरण सोनवणे व शैलेश सोनवणे, तालुका पर्यटन सचिव पंडित वानखेडे, तालुका कार्यकारिणी सचिव ॲड. सुनील सोनवणे, तालुका हिशेब तपासनीस सचिन तायडे, तालुका महिला शाखा कोषाध्यक्ष वंदना वानखेडे आणि ग्रामशाखा अध्यक्ष कविता सपकाळे यांच्यासह संपूर्ण ग्रामशाखा कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्यात वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोप, गाढोदा महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण आणि नूतन श्रामणेरांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंगल प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या जळगाव तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी, धम्म उपासक-उपासिका आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गाढोदा येथील समस्त उपासक, उपासिका व तरुण मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post