मुंबई । मुंबईतील पवई परिसरातील आरके स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवण्यात आलेल्या घटनेनंतर झालेल्या रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात आता नवा आणि मोठा वळण आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे.
याप्रकरणी रोज नवनवे अपडेट्स समोर येत असून मुलांना ओलीस ठेवणाऱ्याना रोहितने घटनेच्या दिवशी पोलिसांना दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून बोलण्याची मागणी केली होती. पोलिसांनी देखील केसरकर यांना फोन करून रोहित आर्यशी संवाद साधण्याची विनंती केली होती. मात्र, केसरकर यांनी त्याच्याशी बोलण्यस नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडीनंतर केसरकर अप्रत्यक्षपणे या प्रकरणाशी जोडले गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे घटनेपूर्वी काय घडले, कोणता संवाद झाला, हे स्पष्ट करण्यासाठी लवकरच पोलीस त्यांचा अधिकृत जबाब नोंदवणार आहेत.
न्यायालयीन पातळीवर हालचाली वेगवान
दरम्यान, रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण न्यायालयातही चर्चेचा विषय ठरत आहे. वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोलिसांवर बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप केला आहे. याचिकेत त्यांनी स्वतंत्र चौकशी करून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणीही केली आहे.















Discussion about this post