Thursday, October 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोसंबी, केळी व पपई पिकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोसंबी, केळी व पपई पिकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत
बातमी शेअर करा..!

जळगाव | पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२६-२७ जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, केळी व पपई या अधिसूचित फळपिकांना विविध हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.
या योजनेत अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होण्यास पात्र आहेत. तसेच कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेत सहभागी होता येईल. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.

फळपिकनिहाय अर्जाची अंतिम मुदत मोसंबी, केळी व पपई या पिकांसाठी ३१ ऑक्टोबर २०२६, संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर २०२६, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर २०२६ आणि डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२७ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

योजनेत संत्रा, मोसंबी व डाळिंब पिकांसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यांचा समावेश आहे. केळी पिकासाठी कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा व गारपीट; आंबा पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान व गारपीट; तर पपई पिकासाठी वेगाचा वारा, जास्त पाऊस व आर्द्रता, कमी तापमान, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यांपासून निर्धारित कालावधीत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. निर्धारित हवामान निकष लागू झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देय राहील.

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, सातबारा उतारा, जिओ टॅग केलेला फोटो तसेच ई-पीक पाहणी/डीसीएस नोंद असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी/डीसीएस नोंद १०० टक्के बंधनकारक असून, ती नसल्यास विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो.

आंबिया बहारातील फळपिकांच्या विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके, विमा हप्ता व संरक्षण कालावधी यांची माहिती घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्र, बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधावा आणि विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहाराकरिता अधिसुचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने फक्त काही दिवस शिल्लक आहेत. तरी फळपिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे” असे कुरबान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदानाच्या काही तास आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! नितेश कराळेंची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोसंबी, केळी व पपई पिकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत

मोसंबी, केळी व पपई पिकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत

October 22, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मतदानाच्या काही तास आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! नितेश कराळेंची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

October 22, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

जळगावच्या सुवर्ण बाजारात मोठी घसरण! सोने १,००० रुपयांनी तर चांदी तब्बल ६ हजारांनी स्वस्त

October 22, 2026
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत जळगावात ५७ जागा उपलब्ध ; दरमहा इतके विद्यावेतन मिळणार?

October 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page