Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती/फ्रीशीप योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
बातमी शेअर करा..!

जळगाव, | ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता 31 जानेवारी पर्यंतच्या मुदतीत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणालीवर महाडीबीटी एडमीन कडून अर्ज नामंजूर झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना देखील ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्यांना कोणत्या कारणांमुळे ऑनलाईन अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटीवरील नामंजूर झालेल्या अर्जांचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सदर अर्ज क्रमांक नमूद नसेल अशा अर्जांचा शिष्यवृत्तीकरिता विचार करण्यात नाही.

ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इ.) महाविद्यालय स्तरावरुन अथवा प्रकल्प अधिकारी स्तरावरुन नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत.

जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणांमुळे महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरु शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणमीमांसासह ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. तथापि, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यास शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. ऑफलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटी प्रणालीवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदविणे आवश्यक असणार आहे. (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाण, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.).
ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती / फ्रीशीपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत. असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती/फ्रीशीपचे ऑफलाईन अर्जाकरिता लागू राहतील. महाडीबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षांत मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती/फ्रीशीपच्या ऑफलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच एकाच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. याप्रकरणी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्यांने द्यावे. या प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांने अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पण्ण झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जांची मंजूरी करण्यास अडचणी आल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत. शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असा मुख्य उद्देश असल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयास शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 जानेवारी 2025 असेल.दिनांक 31 जानेवारी 2025 नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि. जळगांव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बुलढाण्यातून वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समोर; वाचा काय आहे?

Next Post

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page