जळगाव | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
महामंडळामार्फत दरवर्षी इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातही निधीच्या उपलब्धतेनुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज दि. २६ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, महाबळरोड, मायादेवी नगर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास जे. पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post