मुक्ताईनगर । गुटख्याच्या विक्री आणि वाहतुकीवर शासनाची बंदी असतानाही संशयित गुटख्याचा साठा घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बोदवड तालुक्यातील शेलवड फाट्यावर घडली असून अपघातग्रस्त बोलेरोमध्ये विमल गुटख्याच्या पोत्यांमध्ये भरलेला माल आढळून आल्याचे सांगण्यात येत असल्याने या घटनेने अवैध गुटखा वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून गुटख्याचा माल घेऊन एक बोलेरो वाहन बोदवड हद्दीतून जात असल्याची माहिती आहे. शेलवड फाट्याजवळ या वाहनाची दुचाकीला जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पळासखेडा आणि शेलवड परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
दरम्यान, अपघातग्रस्त बोलेरो वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये विमल गुटख्याच्या पोत्यांमध्ये भरलेला माल आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष मुक्ताई पालखी आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात आली होती. असे असताना गुटख्याने भरलेले वाहन शहरातून पुढे गेले असल्यास त्याची तपासणी का झाली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.














Discussion about this post